चांद्रयान-3 मोहिमेसाठी सरकारची मान्यता !

0

दिल्ली : इस्रोने पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. चांद्रयान-3 मोहिमेसाठी सरकारने देखील मान्यता दिली असल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच मोहिमेवर सध्या वेगाने काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

या अभियानासाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असून जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून त्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.चंद्रनन -3 अभियानासाठी 250 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यात आधीप्रमाणे लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.