पारोळा येथे राष्ट्रीय सुरक्षा मंच तर्फे नागरिक संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा.

0

पारोळा-  पारोळा येथे राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे केंद्र शासनाच्या नागरिक संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात येऊन नायब तहसीलदार एन, झेड,वंजारी व पारोळा पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांना निवेदन देण्यात आले.

सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सदर मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरूवात श्रीराम मंदिरापासून रथ चौक, गाव होळी चौक,न,पा,मार्गे  मोर्चा बाजार पेठेतून, हायवे वरून नविन तहसील कार्यालया वर नेण्यात  आल्यावर मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी  तहसीलदार  यांना मोर्चेकऱ्यांन तर्फे निवेदन देण्यात आले मोर्चा अत्यंत शांततेने व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला,भारत माता की जय, वंदे मातरम, या घोषणांनी शहर दुमदुमून गेले मोर्चात हजारोच्या  संख्येने नागरिक, युवा व व्यापारी उपस्थिती होती, पारोळा पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला .या प्रसंगी निवेदन देताना अॅड, अतुल मोरे, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, रविंद्र पाटील, महेश हिंदुजा, मुकुंदा चौधरी, सचिन गुजराती, आशिष हिंदुजा, गोपाल अग्रवाल, अॅड, दत्ता महाजन, प्रविण दाणेज, केशव क्षत्रिय, महेंद्र दाणेज, रावसाहेब गिरासे, तसेच अनेक मान्यवर व्यापारी व महिलावर्ग उपस्थित होते,

Leave A Reply

Your email address will not be published.