मंत्रिपद न दिल्याने काँग्रेसचा ‘हा’ आमदार राजीनामा देण्याच्या तयारी

0

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर मतदारसंघातील आमदार पी एन पाटील हे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

पी एन पाटील समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्यात सामूदायिक राजीनामा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता आमदार पी एन पाटीलकाय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कोल्हापुरातून काँग्रेसने सतेज पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. त्यामुळे पी एन पाटील समर्थक नाराज आहेत.  पी एन पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी जाहीर केली होती. काँग्रेस पक्षासोबत तब्बल 40 वर्ष एकनिष्ठ राहूनही मंत्रिपद न मिळाल्याने पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.