मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा – आमदार किशोर पाटील

0

पाचोरा – आमदार किशोर पाटील तथा कांताई नेत्रालय ट्रस्ट च्या विद्यमाने गेल्या ५ वर्षांपासून पाचोरा – भडगाव तालुक्यातील गोरगरीब, गरजू मोतीबिंदू ग्रस्त रुग्णांसाठी मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन शिबिराचा कार्यक्रम प्रत्येक महिन्याचा २ तारखेला यशस्वीपणे राबविला जात आहे. आज पावेतो हजारो मोतीबिंदूग्रस्त रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या असून, शेकडो रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आलेले आहेत. ऑपरेशन झालेल्या रुग्णांची कुठलीही तक्रार नाही. रुग्णांना नवी दृष्टी लाभून आपल्या जीवनाचा ते आनंद घेत आहेत. हे सुंदर जग पुन्हा पाहू शकत आहेत.

पाचोरा – भडगाव तालुक्यातील मोतीबिंदूग्रस्त रुग्णांनी दि. २ जानेवारी रोजी  सकाळी १० वाजता शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती  कार्यालय या ठिकाणी उपस्थित राहावं तज्ञ डॉक्टरांकडून मोती बिंदू तपासणी व ऑपरेशन करून घ्यावेत. सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. सेवेची संधी द्यावी अशी विनंती पाचोरा – भडगाव तालुका शिवसेना – युवासेना महिला पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.