चांगल्या नोकरीचे आमिष; १६ लाखात फसवणूक

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसत आहे.  चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून भामट्यांनी साडे सोळा लाख रूपयांत  एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

ऑनलाईन पैसे भरण्यास भाग पाडून ही फसवणूक करण्यात आली आहे.  सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंतकुमार मराळकर (रा. काठेगल्ली, द्वारका) यांनी तक्रार दाखल केली मराळकर सोशल मीडियावर नोकरीचा शोध घेत होते. प्लेसमेंटच्या माध्यमातून ते नोकरी शोधत असतांना याच काळात त्यांना वेगवेगळ्या  मोबाईल आणि लॅण्डलाईन नंबर वरून संपर्क साधण्यात आला होता.

मेल आयडीवरही नोकरीचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे मराळकर यांचा विश्वास बसला. २ ते १६ सप्टेंबर दरम्यान चांगल्या पगाराची नोकरीचे आमिष दाखवत भामट्यांनी मराळकर यांना इंडियन आणि बरोडा बँक खात्यात वेगवेगळी कारणे सांगून १६ लाख ५९ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. महिना उलटूनही नोकरी अथवा पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मराळकर यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.