चक्क शेतातून दीड लाखाचे डाळिंब लंपास

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील पिंपळे शिवारातील  शेतातून दीड लाख रुपये किंमतीचे डाळिंब अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार 14 ऑक्टोबर रोजी उघडकीला आले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलीम अमित देशमुख (वय 65 रा. पिंपळे ता. धरणगाव ह. मु. गणेश मंदिराजवळ नाशिक) यांचे तालुक्यातील पिंपळे शिवारात शेत आहे. त्या ठिकाणी त्यांनी शेतात डाळिंबाची लागवड केली आहे. दरम्यान सात आक्टोबर ते 14 ऑक्‍टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीचे डाळिंब चोरून नेल्याचे उघडकीला आले.

याप्रकरणी आनंद देशमुख यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार करीम सय्यद करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.