चक्क गांजाची सामूहिक शेती; तिघांना अटक

0

परळी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेले  मुंबई- क्रुज ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानची अटक आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी झालेली अटक यामुळे सध्या राज्यात चरस-गांजा यांची जोरदार चर्चा सुरू आहे.पण,बीड जिल्हात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात चक्क गांजाची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

प्राप्त  माहितीनुसार परळी तालुक्यातील मोहा या गावात जवळपास दहा ते बारा वर्षांपूर्वी अफूच्या लागवडीवरुन मोठी कारवाई करण्यात आली होती.या प्रकरणी मोह्यातील अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.यानंतर या आठवड्यात ग्रामीण पोलीसांनी धाडसी कारवाई करत बुधवारी ता.२७ ऑक्टोबर रोजी परळी तालुक्यातील गुट्टेवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब दत्ता गुट्टे यांच्या तुरीच्या शेतातील पिकात सात गांज्याची झाडे लावण्यात आली होती.

या शेतामध्ये छापा टाकून ती जप्त करण्यात आली.या झाडांचे वजन १ क्विंटल ७ किलो असून बाजार भावानुसार ४ लाख २८ हजार रुपये किंमतीची ही झाडे असून सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या फिर्यादीवरुन भाऊसाहेब गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच,शुक्रवारी ता.२९ ऑक्टोबर रोजी सकाळी ग्रामीण पोलीसांनी पुन्हा तालुक्यातील हेळंब येथील एका शेतकऱ्याच्या शेतात छापा टाकला असून ग्रामीण पोलीस यासंदर्भात कारवाई करत आहेत.यामुळे,बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.