चंद्रकांत निकम यांना खानदेश साहित्य संघाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी काव्यगौरव पुरस्कार

0

भडगाव – खानदेश साहित्य संघाच्या वतीने नुकताच सुरत येथे नवोदित कवी चंद्रकांत दत्तात्रय निकम यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी काव्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी त्यांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. सदाशिव सूर्यवंशी, सचिव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंद्रकांत निकम यांच्या अनेक कविता विविध वर्तमानपत्रे, साप्ताहिके, दिवाळी अंकांमधून प्रकाशित झाल्या आहेत. तसेच त्यांनी अनेक साहित्य संमेलनांमध्ये आपल्या कविता सादर केल्या आहेत.

चंद्रकांत निकम हे भडगाव तालुक्यातील वडजी येथील रहिवासी असून सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहेत. पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. एन.एन.गायकवाड, उपप्राचार्य प्रा. एस.आर.पाटील, सर्व प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.