घराचा कडीकोयंडा तोडून साडेचार लाखाचा मुद्देमाल लंपास

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे बंद घराचे कडी व कोयंडा तोडून कपाटातील ४ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद धोंडू शिंदे (वय ३४, रा. कोथळी ता. मुक्ताईनगर) हे वरणगाव फॅक्टरीत  नोकरीला आहे. आपल्या कुटुंबीयांसह कोथळी येथे वास्तव्याला आहे. दिवाळीनिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, टाटा स्काय कंपनीचा सेटटॉप बॉक्स आणि ९० हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ८३ हजार १७० रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा  प्रकार समोर आला.

याप्रकरणी विनोद शिंदे यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परविन तडवी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.