घरकुल प्रकरणात देवकर, प्रा.सोनवणे यांना दिलासा

0

रूग्णलायातील कैद्यांना वगळून दंड भरलेल्या आरोपींना जामिन

जळगाव प्रतिनिधी| येथील बहुचर्चित घरकुल घोटाळा प्रकरणातील माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आ.चंद्रकांत सोनवणे यांच्यासह काही आरोपींना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने आज जामिन मंजूर केला. रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आरोपींच्या जामिनाबाबत निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.

जळगाव नगरपालिकेच्या गाजलेल्या घरकुल घोटाळ्यातील शिक्षा झालेल्या आरोपींनी जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अर्ज दाखल केला होता. यात माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह 27 जाणांचा समावेश होता. या अर्जावर आज खंडपिठात सुनावणी होवून निर्णय झाला. रूग्णालयात उपचार घेत असलेल्या पाच जणांना वगळून देवकर, प्रा.सोनवणे यांच्यासह सर्वांचा जमीन खंडपिठाने मंजूर केला आहे. धुळे येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या पाच कैद्यांचा वैद्यकिय अहवाल खंडपिठाने मागविला असून यानंतरच जामिनावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

सुरेश जैन, राजेंद्र मयूर, जगन्नाथ वाणी, प्रदिप रायसोनी यांना मात्र जामीन मंजूर झालेला नाही. दरम्यान, यापूर्वी जामीन अर्जावर दोनवेळा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आज अखेर त्यावर निर्णय झाला असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.