ग. स. निवडणूक पार्श्वभूमवर उमेदवारांची फिरस्ती सुरु

0

भडगाव (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या मोठ्या आर्थिक उलाढालीमुळे परिचीत असलेली जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक लवकरच येत आहे.

या पतपेढीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारा कर्मचारी वर्ग आपण केलेले विविध प्रकारचे विधायक, प्रेरणादायी कार्य “माझी उमेदवारी कशासाठी” मी “आपला हक्काचा माणूस” हे पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सभासदांच्या संपर्कात राहण्यासाठी इच्छुक, भावी उमेदवार प्रचार व प्रसार करताना दिसून येत आहे.निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर बरेच भावी उमेदवार आपला प्रभाव , आपले काम दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.

जणेकरून पक्षाने आपले काम पाहून आपल्याला उमेदवारी दयावी अशा प्रयत्नात आहेत . असेच एक भावी उमेदवार प्रवीण आत्माराम पाटील प्राथमिक शिक्षक असून ते प्राथमिक शिक्षक संघ पाचोराचे कार्याध्यक्ष आहेत आणि तसा त्यांचा जनसंपर्क जिल्ह्यात खूपच चांगला आहे. त्यांच्या जनसंपर्काच्या जोरावर तेदेखील वेगवेगळ्या माध्यमातून त्यात खासकरून व्हाट्सअप, फेसबुक व अन्य डिजिटल चॅनलच्या माध्यमातून उमेदवारी आपणास कशी मिळेल कोणत्या गटामधून याचा विचार न करता ते त्यांच्या कार्यकर्तृत्वावर उमेदवारीसाठी ठाम असून येणाऱ्या भावी काळात त्यांची उमेदवारी दाखल करून ते मोठे आव्हान उभे करणार आहे.

यासाठी त्यांनी कोरोना विषाणूचा काळ असल्याने वेगवेगळ्या शाळा-कॉलेजेस मध्ये भेटी देऊन सॅनिटायझर व स्प्रे पंप देऊन एका नाजूक काळात आपण कशी मदत करू शकतो याची छोटीशी चुणूक दाखवली असून संपर्क राखण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच त्यांनी वडजी येथिल टि .आर .पाटील विदयालयात भेट दिली त्यावेळी विदयालयाचे कार्यक्षम मुख्याध्यापक डि .डि .पाटील, जेष्ठ शिक्षक बी .वाय .पाटील, एस .जे . पाटील , जे.एच .पवार , एम.एस . देसले , वाय. ए . पाटील यांचे सह कर्मचारी हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.