ग्रामीण रुग्णालय चिखली येथे आमदार संजुभाऊ गायकवाड यांची भेट

0

चिखली (प्रतिनिधी) :  स्थानिक वासनिक भवन व उपजिल्हा रुग्णालय नवी इमारत व निवासस्थान येथे नविन कोवीड सेंटर सुरु करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, जिल्हा नियोजन सभेमध्ये या ठिकाणी 50 बेडची मान्यता देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी तहसिदार येळे व वैद्यकिय अधिकारी डॉ.खान यांना दिली.

चिखली शहर व परिसरात  लसीकरण कशापध्दतीने राबविण्यात येत आहे, त्याबाबत जनजागृती व सोशल डिस्टसींगबाबत सर्व सेंटरला व ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून आमदार गायकवाड यांनी माहिती घेतली.

स्थानिक आरोग्य कर्मचारी यांनी त्यांना येणार्‍या कोणत्याही अडचणी असल्यास त्यांनी माझेशी संपर्क करावा, त्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे आश्वासन आ.संजुभाऊ गायकवाड यांनी उपस्थित आरोग्य कर्मचार्‍यांना देवून त्यांचा उत्साह वाढविला.

यावेळी चिखली शिवसेनेच्यावतीने ग्रामीण रुग्णालय परिसरात व  लसीकरण केंद्रासमोर मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती चिखली शिवसेना व युवासेनेच्यावतीने देण्यात आली. बुलडाण्याचे दमदार आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चिखली परिसरातील कोविड सेंटरला ग्रेड भेट दिल्याने भरती रुग्ण, आरोग्य कर्मचारी व शिवसेना व युवासेना पदाधिकार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख नरुभाऊ खेडेकर, उप जिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख रोहीत खेडेकर, युवासेना तालुका प्रमुख नंदु कर्‍हाडे, शहर संघटक प्रितम गैची, बाजार समितीचे संचालक गजानन पवार, युवासेना शहर प्रमुख विलास घोलप, उपतालुका प्रमुख किसनराव धोंडगे, विलास सुरडकर, अ‍ॅड.अनिल कर्‍हाडे, उपशहर प्रमुख समाधान जाधव, सोनु जगदाळे,  युवानेते रवी पेटकर, बंटी गैची, मनोज वाघमारे, बंटी कपूर, पप्पु परिहार, शे बबलु, विजय सुरडकर, अरुण सुरडकर,

यावेळी आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्यासमवेत बुलडाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, ओमसिंग राजपूत, संजु पाटील हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.