एरंडोलला रस्ता काँक्रीटीकरण काम रेंगाळले, चारजण दैव बलवत्तर म्हणून वाचले

0

एरंडोल – सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण प्रचलित होती. कॉम्प्यूटर युगामुळे , व्हाट्सअपमुळे लवकर देखील होवू लागली होती परंतू हे सर्व खोटं ठरवित एरंडोल म्हसावद रस्त्याचे काम सुमारे दोन वर्षांपासून रेंगाळले असल्याने सरकारी काम आणि दोन वर्षे थांब ही म्हणण्याची वेळ आली आहे. रस्त्याची कामे रेंगाळल्याने अनेक अपघात देखील झालेत परंतू या घटनांची दखल अधिकारी, ठेकेदार , प्रशासन घेतील तर ना? एखाद्या बड्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास, रूग्णवाहिका घसरल्याने दखल घेतली जाते एवढंच. दि . ५ मे २०२१ वेळ रात्री ९ .३० वाजेची काँक्रीट रस्त्याचे रखडलेल्या कामामुळे चारचाकी (एमएच १५, ईबी -०६७५ ) जामनेरकडून एरंडोलकडे येणारी घसरली.

आत चारजण (दोन पुरूष , दोन महिला) सुमारे ५ फुट घसरल्याने ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने थांबविली . चारही जण केवळ दैव बलवत्तर म्हणूनच वाचले. अपघात झाल्याचा जोरात आवाज आल्याने सरस्वती कॉलनीसह गिरणा कॉलनीतील रहिवासी धावले . महिलांना धीर दिला. केवळ पाच फुटांवर गाडी थांबवली. अन्यथा चिंचेला धडकली असती अथवा पुलाचे काम अपूर्ण असलेल्या खड्ड्यात कोसळली असती. याठिकाणी खेदाने नमुद करावेसे वाटते की , एरंडोल शहरी हद्दीचे काँक्रीटकरणाचे काम वीजमंडळ ते तहसिल कार्यालय पाच महिन्यांपासून बंद आहे . सार्वजनिक शौचालयापासून दोन्ही बाजूकडून खोदून ठेवल्याने अनेक किरकोळ अपघात झाले आहेत . अनेकवेळा वृत्तपत्रांमधून आवाज उठविला परंतू तरीही काम बंदच आहे . सरस्वती कॉलनीजवळ एक बाजू काँक्रीट तर दुसरी बाजू सुमारे एक फुट खोल असल्यामुळे रात्री वाहनांना लक्षात येत नाही.याच रस्त्याने ग्रामीण रूग्णालयात रूग्णवाहिकेचे ये – जा सुरू असते.त्यामुळे रूग्णासह नातेवाईक जीव मुठीत धरून असतात.सध्या कोरोनाची साथ जोरात सुरू असल्यामुळे सर्वांनाच भिती आहे परंतू रस्त्याचेच काम पूर्ण होत नसेल तर निदान खडी , मुरूम , माती टाकून तरी काम करावे हीच अपेक्षा . प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दखल घ्यावी अशी अपेक्षा वाहनधारक , परिसरातील नागरीकांनी केली आहे . कारण यांचेही कार्यालय याच रस्त्यावर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.