अखेर अनेर धरणातून आवर्तन सोडण्यात आले ; सोळा गावांना मिळणार फायदा

0

चोपडा प्रतिनिधी :- चोपडा तालुक्यातील पश्‍चिम भागातील गणपुर ,भवाळे  ,धानोरा प्र  गलंगी ,वेळोदा , घोडगाव ,कुसुंबा, वाळकी ,शेंदणी , मालखेडा , दगडी ,अनवर्डे , मोहिदा, अजंतीसिम , विटनेर ,वढोदा  इत्यादी सोळा गावातील नागरिकांना ,गुराढोरांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच शेती, बोरवेल्स व  विहिरी आदींची पाण्याची पातळी खोल गेली आहे  .

या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी चोपडा विधानसभेच्या आमदार  सौ लताताई सोनवणे यांनी जिल्हाधिकारी धुळे यांना अनेर धरणातून आवर्तन सोडण्यात यावे या  संदर्भाचे पत्र देऊन वारंवार पाठपुरावा  केला होता ,त्याची दखल घेत अखेर अनेर धरणातून आवर्तन सोडण्यात आले  .अनेर धरणातून आवर्तन सोडते वेळी  एम व्ही  पाटील  (माजी उपसभापती पंचायत समिती चोपडा ) , गोपाल चौधरी ( युवा सेना ) , सुकलाल कोळी  ,शाखा अभियंता पाटबंधारे विभाग आदी उपस्थित होते.

अनेर धरणातून आवर्तन सोडण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव , आमदार सौ लताताई सोनवणे व  तहसीलदार आदींनी पाठपुरावा केला होता त्याची दखल घेत धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आवर्तन सोडण्यात संदर्भातचे पत्र दिले होते .अनेर धरणातून चोपडा तालुक्यातील सोळा गावांसाठी ९१.३५  दलघफू पाणी आरक्षित आहे . सर्वच पाणी  एकाच आवर्तनात सोडण्याचे निर्देश धुळे जिल्हाधिकारी यांनी कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत . पाण्याच्या योग्य विनियोग होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत , तहसीलदार  ,उपअभियंता , तलाठी व  ग्रामसेवक यांची संयुक्तिकरित्या असणार आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.