ग्रामीण भागात रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

0

धानोरा प्रतिनिधी, विलास सोनवणे

ग्रामीण भागात पावसाळ्यात रानभाज्याचा वापर होत असतो, मात्र पावसाळा अनियमीत होत असल्याने  रानभाज्याचे कंद दूर्मिळ होत आहे. आदीवासी जमात रानभाज्यासाठी  भंटकती करीत असून ग्रामीण भागातही नामशेष होण्याचा मार्गावर दिसून येत आहे.

ग्रामीण भागात पावसाळा सुरु झाला की,  आदीवासी  कुंटुबांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपल्बध होतो. जंगलात जाऊन रानभाज्या शोधून गावात, शहरात विक्री करतात त्याना रोजगार मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या खाण्याची  चव ग्रामीण भागातील शेतमजुर व शेतकरी पावसाळ्यात  घेतात. मात्र पावसाळा सुरु होऊन ही ग्रामीण भागात रानभाज्याची प्रतिक्षा कायम  आहे.

दूळीचे फुले व कर्टुले जूलै महीन्यात मोठ्या प्रमाणात उपल्बध होत असत,  मात्र अद्यापही मिळाली नसल्याची  माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. श्रावण महिन्यात अंबाडीची भाजी, चिल्या ढोल्याची भाजी, चिवाईची भाजी ,पोथीचे पाने या भाज्या पावसाळ्या आहारात वापर केला जातो. कर्टुले ह्या फळभाजीला ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातही मोठी मागणी आहे,  मात्र दमदार पाऊस अद्यापही झाला नसल्यामुळे कर्टुले, दुळीचे फुले,  फागड्याची पाने या  रानभाज्याची प्रतिक्षा ग्रामीण भागात दिसुन येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.