ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी बंडू केशव सोनार यांची नियुक्ती

0

 पाचोरा (प्रतिनिधी) :  पाचोरा येथील बंडू केशव सोनार हे विविध माध्यमातून जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लेखणीच्या माध्यमातून कौतुकास्पद काम करीत आहे. याची दखल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षा चंदा शिरसाट व यांच्या संघटनेच्या वरिष्ठांनी घेतली व त्यांनी विभागीय अध्यक्ष राजु जाबरे व विभागीय सचिव भीमराव खैरे यांनी सूचित केले. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशान्वये उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अतिश चांगरे यांनी तालुका माझा न्यूज चे मुख्य संपादक बंडू केशव सोनार यांची एक वर्षाकरिता जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.