एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात काय अर्थ आहे ; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला घरचा आहेर

0

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आयोगाच्या या निर्णयाविरोधात पुण्यातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, राज्यात अधिवेशन, आरोग्य विभागाची भरती आणि मोठमोठे लग्नसमारंभ पार पडतात. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात काय अर्थ आहे, असा सवाल विचारत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिला. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आणि विद्यार्थ्यांच्यादृष्टीने अन्यायकारक असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

एमपीएससी परीक्षा लांबणीवर पडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी परीक्षेबाबत अशाप्रकराची अनिश्चितता योग्य नाही. विद्यार्थ्यांनी आणखी किती दिवस अभ्यास करायचा. राज्यात अधिवेशन आणि लग्नसमारंभ पार पडतात. मग एकट्या विद्यार्थ्यांनाच शिक्षा देणे योग्य नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. हे विद्यार्थी भावी प्रशासकीय अधिकारी आहेत. ते परीक्षेच्यावेळी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करतील, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.