गौरव संजय बोरसे याची इंडियन नेव्ही एस. एस. आर पदी निवड

0

शिंदाड ता .पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील एक गरीब कुटूबातील गौरव संजय बोरसे याची इंडियन नेव्ही एस. एस. आर पदी निवड व वडील संजय ओंकार बोरसे यांनी गौरव रात्र दिवस कबाड कष्ट करून त्यांनी  गौरवचे शिक्षण पूर्ण  केले.  गौरवने पहिली  ते बारावी पर्यतचे शिक्षण नवोदय महाविद्यालय भुसावळ येथे झाले.

तो रोज सकाळ व संध्याकाळी रनिंग व स्पर्धा परिक्षेचे पुस्तके वाचनालयात जाऊन तो अनेक प्रकारचे पुस्तकी ज्ञान घेत होता.  शिक्षण पूर्ण केलं व बारावी  नंतर लगेच त्याने नेव्हीसाठी तयारी केली.  त्याचे इंडियन नेव्हीमध्ये निवड झाली. गावातील  काही मुलांनी त्याच्या या निवडीबद्दल सर्व मुलांनी त्याचा आदर्श  घेऊन त्यांनी सुद्धा आता रनींग व पुस्तकी ज्ञान घेत आहे.  गौरव आता काही दिवसात  ट्रेनींगसाठी  चिल्का बेस ओरिसा येथे रवाना होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.