गोंडगाव येथून आठ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले

0

भडगाव;- तालुक्यातील गोंडगाव येथून अज्ञात इसमाने ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार 30 जुलै रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडला. मुलीचा शोध घेऊनही ती आढळून न आल्याने मुलीच्या वडिलांनी भडगाव पोलीस स्टेशनला 31 जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल केला.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील गोंडगाव येथे मजुरी काम करणारे यांची आठ वर्षे वयाची मुलगी अज्ञात व्यक्तीने 30 जुलै रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास फूस लावून पळून नेल्याची फिर्याद दिल्यावरून भडगाव पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.