गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास 6 लाखांचा विमा

0

मुंबई : अनेकजण घरात गॅस सिलिंडर वापरतात मात्र त्याबद्दल त्यांना फार काहीच माहिती नसते. केवळ गॅस टाकी भरुन आणणे आणि ती वापरणे याचीच पुनरावृत्ती होत राहते. मात्र, गॅस सिलिंडरच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला गॅस सिलिंडर घेतल्यानंतर मिळणाऱ्या अनेक आर्थिक सुरक्षेच्या बाबींना मुकायला लागू शकतं. आज आपण अशाच एका गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत. ही गोष्ट आहे गॅस सिलिंडरचा अपघात आणि त्यावरील विमा. जर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर संबंधित तेल कंपनीकडून लाखो रुपयांचा विमा मिळण्याची तरतूद असते भारतात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या तीन कंपनी गॅस सिलिंडरच्या स्फोटावर सुरक्षा विमा देतात. या इंशुरन्स पॉलिसीचं नाव ‘पब्लिक लायबिलिटी इंशुरन्स असं आहे.  प्रति इव्हेंटसाठी 50 लाखांपर्यत, व्यक्तीसाठी 10 लाखांपर्यंत आणि एक वर्षात 100 कोटी रुपयांपर्यंत असतो.

गॅस सिलिंडरच्या विम्यात कोणते लाभ?

हिंदुस्ताना पेट्रोलियमकडून याबाबत एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय. यात पर्सनल एक्सिडंट कव्हर 6 लाख रुपयांपर्यंत मिळतो. मात्र, वैद्यकीय खर्चाच्या रुपात 30 लाख रुपयांपर्यंत मिळतो. प्रति व्यक्ती ही मर्यादा 2 लाख रुपये आहे. तात्काळ मदतीच्या रुपात 25 हजार रुपये मिळतात. संपत्तीचं नुकसान झालं असल्यास प्रति अपघात 2 लाख रुपये मिळतात. हा लाभ केवळ नोंदणीकृत ग्राहकांना नोंदणी केलेल्या पत्त्यासाठी मिळतो. म्हणूनच तुम्ही ज्या पत्त्यावर गॅस कनेक्शन घेतलंय ते ठिकाण बदललं तर गॅस कंपनीकडील पत्त्यातही वेळीच बदल करुन घ्या. जर तुमचा नोंदणीचा पत्ता आणि अपघात झाला तो पत्ता वेगळा असेल तर तुम्हाला यापैकी कोणताही लाभ घेता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.