गुढे येथे शालेय पोषण आहार : ठेकेदार विरुध्द कारवाईची मागणी

0
भडगाव- सागर महाजन
 तालुक्यातील गुढे येथे शालेय पोषण आहार वाटप करताना तांदुळ गोणीत तांदुळ कमी असल्याचा संशय माजी जिल्हा परीषद सदस्य विकास पाटील यांना आला असता उतरविलेला शालेय पोषण आहार चा केद्र प्रमुखाच्या उपस्थितत पंचनामा करुन कमी आलेला तांदुळ शाळेला परत देत या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. यावेळी शालेय आहार पुरविणा-या ठेकेदारास समज देण्यात आली. हा प्रकार ४ ते ४-३० वाजेच्या दरम्यान घडला. शालेय पोषण आहार ठेकेदार कडुन नेहमीच असे प्रकार घडत असल्याने ठेकेदार विरुध्द कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
गुढे येथिल जिल्हा परीषद, माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहार ठेकेदार कडुन शालेय पोषण आहारचा पुरवठा केला जात होता. यावेळी दुपारी ४ ते ४-३० वाजेच्या सुमारास माध्यमिक शाळेत माल उतरविला जात असताना माजी जिल्हा परीषद सदस्य विकास पंडीत पाटील यांनी अचानक शाळेला भेट दिली असता यावेळी तांदुळ गोणीत तांदुळ कमी असल्याचा संशय त्यांना आला. विकास पाटील यांनी याबाबत केद्र प्रमुख संजय न्हायदे यांना माहिती देवुन या प्रकार बाबत शहानिशा करुन कारवाई करण्याची माहीती भ्रमणध्वनी वरुन दिली.
यवेळी केद्र प्रमुख संजय न्हायदे यांनी तात्काळ घटना स्थळी भेट देवुन तांदुळ गोणीची खातरजमा केली असता उतरविलेल्या ३६ क्विंटल तांदुळ गोणीत प्रत्येक गोणीत ५०० ग्रम ते एक कीलो असा एकुण २८ कीलो तांदुळ कमी असल्याचे निदर्शनास आले. याबाबत रितसर पंचनामा करण्यात आला. पंचनामा करते वेळी केद्र प्रमुख संजय न्हायदे, शाळेचे प्रभारी मुख्यध्यापक महाजन सह विकास पाटील उपस्थित होते. मात्र संबधित ठेकेदार याने कमी आलेला २८ कीलो तांदुळ शाळेस परत करत प्रकरणावर पडदा टाकण्याची विंनती केली. सदर प्रकरण जागेवर मिटविण्यात आले. याबाबत माजी जि.प. सदस्य विकास पाटील यांनी सदर ठेकेदार यास समज देवुन प्रकरण जागेवर मिटविण्यात आले असल्याची माहीती  दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.