भडगाव- प्रतिनिधी
तालुक्यातील पिचर्डे येथे २१ वर्षीय महिला विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, खबर देणार- हेमराज गोविंदा पाटील- पोलिस पाटील पिचर्डे ता. भडगाव यांच्या खबरिवरून दि.११ रोजी दुपारी १२ च्या सुमारास पिचर्डे शिवारात बापू रोहिदास जावरे यांच्या शेतातील विहिरीत संगीता नाना पवार वय २१ ही विहिरीत पडलेली दिसली त्यावेळी मी गावातील नागरिकांना कळविले व त्यांच्या मदतीने मयत- संगीता नाना पवार हीस विहिरीतून बाहेर काढले असता उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. म्हणून भडगाव पोलिस स्टेशन ला सी. आर. पी. सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.