गुटखा मटकामुक्त उत्तर महाराष्ट्र विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिवाकर यांची संकल्पना

0

नाशिक  : गुटखा व मटकामुक्त उत्तर महाराष्ट्र करण्याची संकल्पना काल पत्रकार परिषदेत करण्यात आली.या मोहिमे अंतर्गत तब्बल 1285 केसेस दाखल झाल्या असून दोन कोटी 53 लाख 68 हजार 874 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी राबविलेल्या मोहीमेत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे.

हा गांजा मुंबई तसेच मध्य प्रदेशात पुरवला जातो असे समोर आले आहे. पकडलेले लोक गांजाची शेती कुठे करतात, याचा तपास सुरु आहे. पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, जिल्ह्यासह नाशिक परिक्षेत्रात काही दिवसांत अवैध शस्त्रे पकडण्यात आली असून आरोपींविरुध्द “मोक्का” अंतर्गत कारवाई केली जाईल. अंमली पदार्थ खरेदी करणा- यांना तडीपार केले जाईल.

महानिरीक्षकांशी तीन महिन्यात केलेल्या कारवाईचा आढावा घेतला. द्राक्षे, कांदा, केळी शेतकरी उत्पादकांची परप्रांतीय व्यापारी खरेदीत फसवणूक करतात. पैसे बुडवतात. त्यावर कारवाई केली.

मुलांना शासकीय नोकरीत लावण्याचे आमिष दाखवून लुबाडले जाते.त्यावर उपाय योजना करण्यात आली आहे.

अवैध शस्त्रे प्रकरणी 40 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात 44 गावठी कट्टे, 74 काडतुसे व 121 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक श्री प्रताप दिवाकर यांनी पत्रकारांचे सहकार्य  बद्दल आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.