गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा अन्यथा केळी फेक आंदोलन

0

सोपान पाटील यांचा इशारा

जळगाव ;- जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रावेर येथे केळी बागेच्या नुकसानीची पाहणी करीत असताना यावेळी शेतकरी समितीचे सोपान पाटील यांनी ना. महाजन यांना केळी उत्पादक शेतकर्याना शासनाकडून त्वरित भरपाई द्यावी तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करायला हवी होती अशी मागणी केली होती . मात्र यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती .त्यावेळी जलसंपदामंत्र्यांकडून धक्काबुक्की झाली असा आरोप करून गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सोपान पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केली . तसेच यावेळी केळी अंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी पाटील यांनी दिला .

यावेळी बोलताना सोपान पाटील म्हणाले कि , जिल्ह्यात केळीचे ७०० ते ८०० कोटींचे इतके मोठे नुकसान झाले असून त्यांनी पाहणी करणे महत्वाचे होते . मात्र तसे काही झाले नाही . ना. गिरीश महाजन यांनी माझ्याशी बोलताना समाधानकारक उत्तरे दिली नाही व मलाबाहेर काढले . हेक्टरी १ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी . यावेळी महाजन यांच्याकडून धक्काबुक्की केली . मात्र हि धक्काबुक्की मी ज्येष्ठ असल्याने अवमानकारक वाटत नाही . येत्या काही दिवसात ना. गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर केळी फेकून आंदोलन केले जाईल असा इशारा सोपान पाटील यांनी केला . तसेच यावेळी त्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली . तसेच जिल्ह्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मोठा प्रकल्प राबविला नाही ,पाटचऱ्यांचे कामे केली नाही . ती करायला हवी होती अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली .

Leave A Reply

Your email address will not be published.