गार बर्डी धरण ओव्हर फ्लो, शेतकऱ्यांमध्ये आनंद

0

चिनावल, ता.रावेर (वार्ताहर) : येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वतरांगेतील सुकी नदीवर असलेल्या गारवडी धरण आज दि. 24 रोजी ओव्हर फ्लो झाले आहे.

सातपुडा पर्वत निसर्गरम्य ठिकाणी सुकी नदीवर असलेले धरण पर्यटकांसह परिसरातील विशेष करून रावेर यावल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. आज धरण पूर्ण भरून १०० टक्के पाणीसाठा धरणात साठला असून धरणाच्या सांडव्यावरून दोन ते तीन सेंटीमीटर पाणी फेकले जात आहे.

यामुळे सुखी नदी वाहती राहणार असून नदी प्रवाहाच्या आजूबाजूच्या शेतीशी वरांना नदीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. तर रावेर यावल सह संपूर्ण जिल्हाभरात पर्यटक येथे धरणाचा निसर्गरम्य रूप व सांडव्यावरून फेकले जाणारे फेसाळ पाणी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करीत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.