‘त्या’ वक्तव्याचा स्वाभिमानी संघटनेने केला निषेध

0

पाचोरा (प्रतिनिधी) : शिक्षकांना चार महिन्यांपासून काम नाही म्हणून “नो वर्क नो पे” करावे असे म्हणणारे विदर्भातील मुख्याध्यापक यशवंत  परशुरामकर यांचा जळगाव जिल्हा स्वाभिमानी संघटनेतर्फे निषेध करण्यात आला.

राज्यात कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे सरकारची आर्थिक घडी विस्कटली आहे. हा धागा पकडून स्वतः मुख्याध्यापक असलेले यशवंत परशुरामकर शिक्षकांना गेल्या चार महिन्यापासून काम नाही. म्हणून शिक्षकांना “नो वर्क- नो पे” म्हणणाऱ्या परशुरामकर यांचा जळगाव जिल्हा स्वाभिमानी शिक्षक- शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी पाटील, प्रदेश कार्यवाह विजय कचवे, प्रदेश उपाध्यक्ष हिरालाल पवार यांनी पत्रकाद्वारे निषेध केला आहे. प्रदेश कार्यवाह विजय कचवे यांनी टीका करताना म्हटले की, या महामारीच्या काळामध्ये शिक्षकांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून अनेक ठिकाणी शासनाच्या आदेशानुसार ड्यूट्या करत आहेत. अनेक शिक्षक पोलिसांसोबत चेक पोस्टवर रात्रीच्याही ड्युट्या करत असून, ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आहे. त्या ठिकाणीही शिक्षकच आहेत. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागामध्ये जी आरोग्य समिती आहे.

त्या आरोग्य समिती सोबत रेशन दुकान असेल, तसेच समिती सोबत फिरणे असेल. त्यांनाही शासनाने काम करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर गेल्या जून पासून शाळेचे ऑनलाईन कामे तसेच विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके देणे. ही सर्व कामं करीत असतांना अनेक शिक्षकांना कोरोना झाला. काही शिक्षकांचा तर या व्हायरसमुळे मृत्यू पण झालेला आहे. अशी ही सर्व कामं करत असतांना “नो वर्क- नो पेमेंट” असा म्हणणारा मुख्याध्यापक कोण ? असा सवाल स्वाभिमानी संघटनेने उपस्थित केला आहे. प्रत्यक्ष वर्गात जरी शिक्षकांना काम नसेल, तरी बाकीची सर्व कामं मुख्याध्यापकासह शिक्षक करीत आहेत. त्यामुळे या मुख्याध्यापकाला असं म्हणण्याचा अधिकार दिला कोणी? असा सवालही स्वाभिमानी संघटनेने उपस्थित करीत सदर मुख्याध्यापकाचा निषेध केला आहे. यावेळी बद्रीनाथ चौधरी, संजय अलोणे, आबा पाटील, रजनीकांत भामरे, भूषण भदाणे आदी. पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख उत्तमराव मनगटे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.