भुसावळातील हाणामारी प्रकरणातील फरार आरोपीस अटक

0

भुसावळ (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन झालेल्या हाणामारी बाबत  बाजारपेठ पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी एका गुन्ह्यात दिड महिन्यांपासून पसार आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

६ जून रोजी दुपारच्या सुमारास  झालेला किरकोळ वाद हाणामारी पर्यंत पोहोचला होता  या घटनेत तक्रारदार तुषार अनिल जंजाळे (१९, रा.श्रीराम नगर, भुसावळ) यांने  फिर्याद दिल्यावरुन आरोपी सुश्रृत झोपेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सुश्रृत विनोद झोपे (२७ रा.श्रीराम नगर, भुसावळ) हा फरार होता.

आरोपी झोपे गुरुवार रोजी  गंगाराम प्लॉट भागात आल्याची गोपणीय माहिती मिळाल्यावरुन  त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजाजन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, नाईक रवींद्र बिर्‍हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, महेश चौधरी, तुषार पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे, बंटी कापडणे आदींनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.