गांभीर्य – प्रा. उमेश वाणी, जळगांव

0

🙏 *सर्व धर्मीय समाज बंधू भगिनींना कळकळीचे आवाहन  🙏

हिंदूनववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा,

आज प्रथमच देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची दाहकता जाणवत आहे, किंबहुना ती जाणून घेतली पाहिजे, कुटुंबातील सर्वच सदस्य रात्री तीन वाजेपर्यत झोपले नाही.२१ दिवसांचे आपण पालन केले नाही तर आपल्याला त्याचे २१ वर्षापर्यंत परीणाम भोगावे लागू शकतात याची गंभीरता काल मोदींनी देशाला उद्देशून कळकळीची विनंती केली आहे. जर लोकांनी याचे पालन केले नाही तर तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी प्रसंगी गोळी घालण्याचे आदेश दिले जातील असे सांगितले आहे. यावरून याचे स्वरुप, गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. कोरोनाचा प्रादुर्भाव पहिल्या एक लाख लोकांना ६७ दिवसात होतो, त्यापुढील एक लाख लोकांना तो अकरा दिवसात होतो तर त्यापुढील एक लाख लोकांना चार दिवसात याचा प्रादुर्भाव होतो. विचार करा पुढील एक लाख लोकांना याचा प्रादुर्भाव काही तासात होण्याची शक्यता आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतःची, कुटुंबातील सदस्यांची आणि इतरांची काळजी घ्यावी. आपण २१ दिवस घराबाहेर पडूच नये. याकाळात घरात असलेल्या पुस्तकांचे वाचन करावे, कार्यालयीन कामकाज घरूनच करावे. इतर वेळेत विविध छंद जोपासावे. विशेषतः लहान मुले आणि जेष्ठ नागरीकांमध्ये घरात बसून चिडचिडेपणा आणि तणाव वाढू शकतो. अशावेळेस आपण आक्रमक न होता संयमाने कुटुंब सदस्यांशी वर्तन ठेवावे. घरात विविध कलाप्रकार, छंद जोपासावे. शाळा, क्रिडांगण, सिनेमागृह, मनोरंजा स्थळे बंद असल्याने तसेच एकत्र खेळणेही शक्य नसल्याने मुलांचे व्यवस्थापन करणे त्यांना येनकेन प्रकारे गुंतवूण ठेवणे आहे. याप्रसंगी आपलीही दमछाक व वर्तनात बदल होऊ शकतो. यासाठी घरातच सकाळी सर्वांनी लवकर उठून एक तास प्राणायम आणि योगासने करावीत. घरात पूजाअर्चा करून नामस्मरण करावे. दिवसभरात शक्यतो कमीतकमी आहार घ्यावा, यामुळे अँसिडीटी व इतर आजार टाळता येतील. याकाळात आपणास डाएट करण्याची चांगली संधी आहे. याकाळात कोणालाही टिव्हि आणि मोबाईल खेळण्यापासून वंचित ठेऊ नका कारण हेच करमणूकीचे घरातील मुख्य साधन आहे. टिव्हीवरील प्रबोधनात्मक सिरीयल आणि सिनेमा बघा.
हे सर्व करण्यासाठी संयम, त्याग नावाचे कौशल्य आपली परीक्षा घेणार आहेत. या २१ दिवसांच्या परीक्षेत आपण नक्कीच पास होऊन दाखवू या. अनेकवेळा आपल्यामध्ये अनाठायी देशभक्ती संचारते, हीच देशभक्ती दाखविण्याची वेळ आज आपल्यावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक व्यक्ती सीमेवर लढा देऊ शकत नाही, समाजसेवा आणि देशसेवा बजावू शकत नाही अशा व्यक्तींनी २१ दिवस घराबाहेर पडू नये हीच खरी देशसेवा ठरु शकेल.
मित्रहो हे सर्व करीत असतांना ज्यावेळी आपण अन्नाचा घास स्वतःसाठी घ्याल अशा वेळेस आपले समाजबांधव, शेजारी, गावातील कष्टकरी शेतकरी, अंगमेहनतीचे काम करणारे सर्व प्रकारचे मजूर, घरगडी, घरकाम करणाऱ्या महिला, पोलिस, डॉक्टर इत्यादींची आठवण ठेवा प्रसंगी यथाशक्ती मदत करा.🙏
याकाळात प्रत्येकाची आर्थिक घडी विस्कटणार आहे, किंबहूना काहींची रोजीरोटी जाऊन उपासमारीची वेळ येणार आहे याचेही भान आपण ठेवले पाहिजे. आपण कितीही श्रीमंत असाल, सर्व सोईसुविधा युक्त असाल मात्र आपण सामान्य माणसाप्रमाणे शासनाचे नियम पाळले पाहिजेत. कोरोना विषाणूला गरीब श्रीमंत, जात, धर्म, पंथ माहित नाही. जो नियम पाळेल तोच जीवन जगण्याचा अधिकार मिळवू शकतो हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्यावे. पंतप्रधानांनी कोरोनाची मांडलेली दाहकता आणि व्यक्त केलेली भिती यास आपण गांभिर्याने घ्यावे.
हीच आपणास गुढीपाडव्याच्या शुभेच्छा निमीत्ताने अपेक्षा.
चला तर मग कोरोना प्रादुर्भावाच्या या युध्दात आपण एक होऊन सरकारला सहकार्य करून आपला देश सशक्त व सबळ करु या.

आपलाच हितचिंतक
प्रा. उमेश वाणी, जळगांव.🙏
+91 94222 79951

Leave A Reply

Your email address will not be published.