गांधी शांतात यात्रेत शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र

0

मुंबई : केंद्र सरकारच्या सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आज भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गांधी शांती यात्रेला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, या यात्रेदरम्यान, आजपर्यंज न घडलेले चित्र सर्वांसमोर आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे राज्याच्या राजकारणातील दोन मोठे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. एकमेकांविरोधात मैदानात सतत आरोप-प्रत्यारोप करणारे हे दोन्ही नेते आज मात्र एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले.

मुंबईत भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गांधी शांतता मार्च यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शांतात मार्चसाठी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्याचं चित्र पहायला मिळालं. याशिवाय नवाब मलिक, पृथ्वीराज चव्हाणदेखील उपस्थित होते. शरद पवार यांनी यावेळी बोलताना महात्मा गांधी यांच्या विचारावर चालण्याची गरज असून नव्या कायद्यांमुळे देशाच्या एकतेला धोका असल्याची भीती व्यक्त केली.

ही यात्रा मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया इथून ही यात्रा सुरू होणार असून अनेक राज्यांमधून मार्गक्रमण करीत ती पुढे दिल्ली येथे संपणार आहे. सरकारने संसदेत एनआरसी रद्द करण्याची घोषणा करावी, अशी मागणी या यात्रेद्वारे सरकारकडे केली जाणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा येथून जात 30 जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या स्मृतीदिनी त्यांच्या स्मृतीस्थळी राजघाटावर ही यात्रा संपणार आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.