गरुड विद्यालयात आदर्श विद्यार्थी आदर्श वर्ग गुणगौरव सोहळा उत्साहात

0

शेंदुर्णी :- येथील आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी विद्यालयातील आदर्श वर्ग व विद्यार्थी यांची निवड व त्यांचा गुणगौरव सोहळा तसेच ओरल हेल्थ प्रोग्राम हा संयुक्त कार्यक्रम विद्यालयाच्या पटांगणात उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाची रुपरेषा आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती एस व्ही पाटील यांनी मांडली.

यानंतर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस एस जैन सर यांनी ओरल हेल्थ प्रोग्राम या विषयी थोडक्यात माहिती व आलेल्या सर्व डॉक्टर्स यांचा परिचय करून दिला त्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली तसेच विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती व्ही पी शिंपी मॅडम यांनी आदर्श विद्यार्थ्यांची नावे घोषित केली त्यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी च्या सर्व वर्गातून क्रमशा इयत्ता पाचवी ब चा विद्यार्थी श्रीराम सुरेश बागुल व विद्यार्थिनी पाचवी क मधून कोमल अशोक धनगर तसेच इयत्ता सहावी वर्गातून नवीन रमेश राठोड व विद्यार्थिनी इयत्ता सहावी इ संस्कृती गिरीश कुमार उपाध्याय आणि इयत्ता सातवी मधून विद्यार्थी लोकेश पंडित थोरात इयत्ता सातवी ड व इयत्ता सातवी ग मधून ज्योती विकास नाईक यांची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड झाली.

तसेच इयत्ता 8 ते 10 च्या गटातून आठवी ब मधून विद्यार्थी नाईक सुरेश जगन व आठवी अ ची विद्यार्थिनी मोनाली गणेश राजपूत इयत्ता नववी चा विद्यार्थी राठोड दीपक नारायण इयत्ता नववी फ मधून विद्यार्थिनी पायल गणेश भारी तसेच इयत्ता दहावी ब मधून विद्यार्थी गीतेश संजय पाटील व विद्यार्थिनी मधून इयत्ता दहावी ड शुभांगी समाधान बारी या विद्यार्थ्यांची आदर्श विद्यार्थी म्हणून निवड झाली.

तसेच पाचवी ते सातवीच्या विभागातून इयत्ता सहावी फ चा आदर्श वर्ग म्हणून निवड करण्यात आली व आठवी ते दहावीच्या विभागातील नववी फ वर्गाची आदर्श वर्ग म्हणून निवड झाली सर्व विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले त्यानंतर इयत्ता सातवी अ चे वर्ग शिक्षक श्याम पाटील यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले तसेच सातवी फ वर्गातर्फे पुस्तक ग्रंथालयाला भेट देण्यात आले. यानंतर ओरल हेल्थ प्रोग्राम डॉक्टर भूषण गरुड बीडीएस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना सुमारे 1000 कोलगेटचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

तसेच डॉक्टर भूषण गरुड यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये दातांची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार अशोक जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ भूषण गरुड डॉ अजय सूर्वे डॉ अतुल पाटिल विजय राठोड डॉ मंगेश पाटील नगरसेविका चंद्रभागा धनगर नगरसेविका वैशाली गुजर नगरसेविका भावना जैन पत्रकार अतुल जहागीरदार व उपस्थित सर्व मान्यवर पालक विद्यालयाचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती टी जी पाटील यांनी केले तसेच प्रास्ताविक श्रीमती एस वि पाटील यांनी केले आभार प्रदर्शन श्रीमती एस ए भामरे यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.