मारोती कार पॅजो रिक्षावर घडकली; महीलेसह सहा जखमी

0

पिण्याचे पाणी घेवून येत असतांना झाला अपघात

पाचोरा :- पाचोरा शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर पिण्यासाठी पाणी घेऊन जात असलेल्या रिक्षाला सालासर जिनिंग प्रेसिंगजवळ वाडी शेवाळेकडून भरधाव वेगाने येत असलेल्या मारोती ८०० या वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात पॅजो रिक्षा पलटी होवून रिक्षातील एका महिलेसह अन्य सहा जण जखमी झाले. अपघातातील जखमींवर पाचोरा येथील विग्नहर्ता मल्टिस्पेशलीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घडविलेल्या मारोती कार चालक स्वत:हुन पाचोरा पोलीस ठाण्यात शरणागतीस आले. सदरची घटना दि. २१ रोजी सायंकाळी सात घडली असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तालुक्यातील निंभोरी बु येथे भिषण पाणी टंचाई असल्याने गेल्या महिनाभरापासून नळांच्या तोड्यांना पाणीच येत नसल्याने नागरीक जमेल तेथून पिण्यासाठी पाणी आणून आपली तहान भागवतात. येथील रिक्षा चालक अशोक आनंदा पाटील हे पत्नी संगीता, मुलगा कार्तीक याचेससह भडगांव रोडवरील पाण्याच्या टाकिहून पाण्याच्या प्लास्टिकच्या कॅना भरुन निंभोरी बु” येथे जात असतांना त्यांना कृष्णापूरी स्टॉपजवळ भाऊसाहेब गुलाबराव देशमुख, दादाराव व्यंकटराव शेळके, विष्णू सुभाष नलावडे हे गावतीलच प्रवाशी मिळाल्याने रिक्षा पाचोरा मोंढाळे रोडवर जात असतांना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या मारोती ८०० (एम. एच. १९ ए. एक्श. ०३७४) या वाहनाने पॅजो रिक्षा (क्रमांक एम. एच. १९ क्यू. ७४०) ला जोरदार धडक दिल्याने रिक्षा पल्टी होऊन त्यातील संगिता अशोक पाटील वय – ४५, भाऊसाहेब गुलाबराव देशमुख वय – ४७ यांच्या पायाला जबरी मार लागल्याने पाय फॅक्चर झाले. तर दादाराव व्यंकटराव शेळके वय – ३६, विष्णू सुभाष नलावडे वय – ३६, कार्तीक अशोक पाटील वय – १८ रिक्षा चालक अशोक आनंदा पाटील वय – ५० रा. सर्व निंभोरी ता. पाचोरा हे किरकोळ जखमी झाले. मारोती कार चालक दिपक मोरे हा पाचोरा पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र तायडे हे घटनेचा तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.