शिवसेना आक्रमक ; खडसे कुटुंबियांना मदत करणार नाही

0

शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

शिवसेना – भाजप युतीला मुक्ताईनगरात मोठा सुरूंग

मुक्ताईनगर :– शिवसैनिक रिशीने पेंटून निघाले असून खडसे कुटुंबियांना मदत करणार नाही, असा पवित्रा घेत रावेर मतदार संघातील शिवसैनिक व पदाधिकारी यांनी ठाम निर्णय घेत दि. 21 रोजी मुक्ताइनगर येथे शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या घरासमोर शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केले.भाजप शिवसेना नेते युतीबाबत प्रचारासाठी आढावा घेत असतांना ह्याच युतीला मुक्ताईनगरात मोठा सुरुंग लागला आहे. युती तोडण्याची भाषा करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबद्दलचा राग मनात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकामध्ये कायम आहे. तसेच सुरुवातीपासुन खडसेंनी शिवसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे हे शिवसेना संपविण्याचे काम करत असल्याचा आरोप शिवसैनिकांकडुन करण्यात आला. तसेच जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी समस्त शिवसैनिकांच्या भावना पक्षप्रमुखापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन यावेळी दिले.

रावेर लोकसभेत खडसे कुटुंबियांना मदत करणारच नाही, असे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांअगोदर स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणुक अवघ्या एक महिन्यावर आली असतांना रावेर लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनि जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटिल यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केल आहे. रावेरची जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी ह्या आंदोलना दरम्यान करण्यात आली.

या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसैनिकानी मनातील नाराजी व्यक्त केली असून ही नाराजगी आजची नसुन 25 वर्षापासुन आहे. जेवढा अत्याचार इंग्रजानी भारतीयांवर केला नाही तेवढा अत्याचार शिवसैनिकांवर झाला असल्याची टिका यावेळी अफसर खान यांनी खडसेंवर केली. यानंतर दबावतंत्राचा वापर करुन कार्यकर्त्यांवर झालेल्या खोट्या केसेसचा पाढा उपस्थितांना वाचुन दाखविण्यात आला.

”युती तोडणा-या खलनायकाचे काम करणार नाही रे भो’, ‘रावेर लोकसभा आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” अश्या विविध घोषणांनी परिसर दणाणला. शेवटी हेच ठिय्या आंदोलन शांत करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसैनिकांना भेटून काही दिवसांअगोदर बेलसवाडी येथील शिवसैनिकांचा खडसें यांनी भाजपमध्ये कसा प्रवेश करवुन घेतला, भाजप शिवसेना युती झाल्यानंतरही शिवसेना संपवण्याच काम हे खडसेंच चालु आहे, म्हणुन अश्या लोकांना शिवसेनेने मदत करायची का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती केला. पदाधिकारी तसेच शिवसैनिकांच्या ज्या ही मागण्या असतील त्यासाठी एक समिती स्थापन करुन त्या समितीद्वारे ऊद्धवसाहेबांना मातोश्रीवर भेटुन व्यथा मांडणार असल्याची चंद्रकांत पाटलांनी ग्वाही दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.