ख्वॉजामिया चौकातील पेट्रोल पंपाची तपासणी

0

 जळगाव, दि.1 –

डीझेल कमी देत असल्याची होती ग्राहकाची तकार
वैध मापनशास्त्र विभागाच्या अधिका-यांनी केली पाहणी

शहरातील ख्वॉजामिया चौकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर कमी पेट्रोल मिळत असल्याची तकार एका ग्राहकाने वैध मापन शास्त्र विभागाकडे रविवारी केली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी वैध मापन शास्त्र विभागाच्या अधिका-यांनी पेट्रोल पंपावर तपासणी केली. यावेळी ग्राहकाचे समाधान झाल्याने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
शहरातील मनोज वाणी हे दि.31 डिसेबर 2017 रोजी दुपारी 4.30 वाजता स्वतची चारचाकी कमांक एमएच.17.एएस.1112 मध्ये ख्वॉजामिया चौकाजवळ असलेल्या पलोड सर्व्हो इंटरप्रायझेस या पेट्रोल पंपावर आले होते. यावेळी त्यांनी गाडीचे डीझेल टॅक पूर्ण भरण्यास सांगितले. पेट्रोल पंपावरील कर्मचारी गोविंदा पिसाळ याने संपूर्ण टॅक डीझेलने भरले. एकूण 82.41 लीटर डीझेल त्यामध्ये मावले.
वैध मापनशास्त्र विभागाकडून तपासणी
वाणी यांनी तकार नोदविल्याने वैध मापन शास्त्र विभागाचे निरीक्षक सी.डी.पालीवाल व सहाय्यक सुनील भट यांनी सोमवारी दुपारी पेट्रोल पंपावर तपासणी केली. अधिका-यांनी पेट्रोल पंपावर 1-1 लीटर याप्रमाणे 85 बाटल्या भरन तपासल्या. परंतु त्यात काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.
शंकेचे निरसन झाल्याने परतले अधिकारी
पेट्रोल पंपाचे मालक गोपाल पलोड, तकारदार मनोज वाणी यांच्यासमोर तपासणी झाल्यानंतर काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. चारचाकीच्या इंधन टाकीची क्षमता कदाचीत अधिक असावी असा अंदाज पलोड यांनी व्यक्त केला. त्यामुळे इंधन टाकी काही दिवसांनी चारचाकीच्या अधिकृत शोरममध्ये तपासणार असे वाणी यांनी स्पष्ट केले.
दुस-या दिवशी मिळाले पैसे- डीझेल भरताना काहीतरी गडबड असल्याची शंका वाणी यांना आली. त्यामुळे त्यांनी डीझेलचे पैसे जमा केलेले नव्हते. दुस-या दिवशी त्यांच्या शंकेचे निरसन झाल्यानंतर त्यांनी पैसे जमा केले.

Leave A Reply

Your email address will not be published.