जिल्हा रुग्णालय मारहाण प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

0

जिल्हा रुग्णालय मारहाण प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी
जळगाव-
नातेवाईकास पाहण्यासाठी आलेल्या तरूणांना मोटारसायकलस्वार तरूणांच्या टोळीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून त्यांना सोमवारी न्यायाधीश घोरपडे यांच्या न्यायालयात हजर केले 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा रूग्णालयात तमीजा बी या महिलेस पाहण्यासाठी शेख सलमान शेख मेहबुब, शेख हसीम मयोद्दीन, ईस्माईल कय्युब खान हे तरूण आले असता त्यांना मोटारसायकवरून आलेल्या दहा ते पंधरा जणांच्या टोळीने बेदम मारहाण करून जखमी केले होते. त्यानंतर शेख सलमान याच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दहा ते पंधरा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, जिल्हा पेठ पोलिसांनी तपासचक्र फिरवून मारहाणीतील संशयित शंकर पंडीत सोनवणे (वय-31, रा. सिंधीकॉलनी) व सागर अशोक जोशी (वय-22, रा.संजयगांधी नगर) यांना अटक केली. सोमवारी दोघांना वैद्यकीय तपासणी केल्यानंतर न्यायाधीश घोरपडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.हेमंत मेंडकी यांनी कामकाज पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.