खुशखबर! 2-18 वयोगटाला मिळणार Covaxin लस?

0

मुंबई : देशभरातील कोरोना साथीला रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या देशात पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींना, तसेच अठरा वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत 18 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये. पण आता 18 वर्षांखालील वयोगटातील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. सहाजिकच ही आनंदाची बाब आहे. हैद्राबादच्या भारत बायोटेक कडून २ ते १८ वर्ष वयोगटातील व्यक्तींच्या क्लीनिकल चाचणीकरीता शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी तज्ञांच्या पॅनलने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची फेज 2 आणि 3 मधले 2 ते 18 वयोगटातील साठी क्लिनिकल चाचण्यांसाठी शिफारस केली आहे. 2-18 वयोगटासाठी कोवॅक्सिनच्या क्लिनिकल चाचण्या करण्याची शिफारस तज्ञांनी केलीये. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये एम्स रुग्णालयात, पाटणामध्ये एम्स रुग्णालयात आणि नागपुर मधील मेडिट्रीना इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स या ठिकाणीही क्लिनिकल चाचण्या घेण्यात येणार आहेत एकूण 525 सब्जेक्ट वर या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

त्यामुळे आता तज्ञांच्या शिफारसी नंतर दोन ते अठरा वयोगटातील व्यक्तींसाठी लवकरच लस उपलब्ध होणार का असा सवाल उपस्थित होता आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सबजेक्ट एक्सपर्ट कमिटीने (SEC) कोव्हॅक्सिनच्या प्रस्तावावर मंगळवारी विचार केला. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन फेज 2 आणि 3 मध्ये दोन ते 18 वयोगटासाठी क्लिनिकल चाचण्या साठी परवानगी मिळावी अशी मागणी हैदराबाद भारत बायोटेक कडून करण्यात आली होती कोवॅक्सिनच्या डोसची सुरक्षितता आणि मूल्यांकन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर विचार केल्यानंतर या तज्ञांकडून पॅनल करून याबाबत शिफारस करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.