जळगावात धावत्या रेल्वेखाली न्यायालयीन कर्मचाऱ्याची आत्महत्या

0

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटेनगरनजीकच्या रेल्वे रुळावर धावत्यारेल्वेखाली रावेर न्यायालयात नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी ४ उघडकीस आली असून आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. दरम्यान, याप्रकरणी लोहमार्ग अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील खोटेनगर परिसरातील रहिवासी हितेंद्र हेमकांत कुलकर्णी हे आई, पत्नी व दोन मुलींसह वास्तव्यास असून ते रावेर न्यायालयात नोकरीस आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजता सुमारास हितेंद्र यांनी खोटेनगरजवळील रेल्वे रुळावर धावत्यारेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. दरम्यान घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यात त्यांना हितेंद्र यांचे ओळखपत्र आढळून आल्याने त्यांनी ओळख पटली. त्यानंतर पंचनामा करुन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हितेंद्र कुलकर्णी यांचे कुटुंब उच्चशिक्षित असून कुटुंबातील बहुतांश सदस्य हे शासकीय सेवेत आहेत. गेल्या वर्षभरापूर्वी २६ जानेवारी रोजी हितेंद्र यांच्या लहान भावाचे निधन झाले. त्यानंतर १७ मे २०२० रोजी वडीलांचे देखील अकस्मात निधन झाले तर मार्च महिन्यात त्यांच्या काकाचे देखील निधन झाले. दरम्यान आता हितेंद्र यांनी आत्महत्या केल्याने एकाच वर्षात कुटुंबातील चार जणांचे निधन झाल्याने कुलकर्णी कुटुंबावर मोठा आघात कोसळला.

Leave A Reply

Your email address will not be published.