खा.रक्षा खडसेंची आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी

0

मुक्ताईनगर :- माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांनी मतदारांसोबत होळी साजरी करीत आनंद साजरा केला. खा. रक्षा खडसे यांनी आगामी निवडणुकीसाठी जोरदार प्रचारास प्रारंभ केला आहे. विरोधी उमेदवार जाहीर होण्याआधीच त्यांनी मतदार संघात संपर्क मोहिम सुरू केली आहे. दरम्यान, देशभरात सर्वत्र होळीचा जल्लोष असतांना रक्षा खडसे यांनी आपल्या मतदारांसोबत होळी उत्सव साजरा केला. याप्रसंगी आ.एकनाथ खडसेसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विविध गावांमध्ये महिलांनी रक्षा खडसे यांचे स्वागत करून त्यांच्यासोबत रंग खेळून होळीचा आनंद घेतला. काल रात्री भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आली. यामध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा रावेरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

यामध्ये त्यांनी राजुरा, हिवरा, जोंधनखेडा, उमरा या गावांतील आदिवासी बांधवांसमवेत पारंपारिक पद्धतीने आणि विविध गावात गावक-या समवेत धुलीवंदन साजरे केले. याप्रसंगी भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, भाजप तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.