रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल फटाक्यांच्या अतिषबाजीने जल्लोष

0

भुसावळ :- भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या यादीत १८२ उमेदवारांची नावे जाहीर केली. यात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा रावेरमधून उमेदवारी जाहीर झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व जयघोष करीत फटाक्यांच्या अतिषबाजीने साकेगाव ग्रामपंचायत सरपंच कमिटी व भारतीय जनता पार्टी या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत समोर जल्लोष केला.

याप्रसंगी सरपंच अनिल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील, सुभाष कोळी, माजी सरपंच आनंद ठाकरे, सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील, संतोष भोळे, दिगंबर पाटील, गजानन कोळी, अनिल सोनवाल, अनिल कोळी, प्रमोद चव्हाण, दिगंबर फालक, निवृत्ती बुधो, गोमा मराठे असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.