भाजपची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा

0

नवी दिल्ली :– भाजपने लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत देशातील महत्त्वाच्या मतदारसंघातील १८२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. गांधीनगरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, लखनऊमधून राजनाथ सिंह तर नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी 20 राज्यातील 182 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

१४ खासदारांवर भाजपाने टाकला पुन्हा विश्वास
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील ज्या १६ उमेदवारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली त्यात दोघे वगळता १४ विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (नागपूर), भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (जालना), केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर (चंद्रपूर), सुभाष भामरे (धुळे) यांच्यासह १४ विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

रावेरमध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पक्षाने सांभाळून घेतले आहे. रक्षा या खडसे यांच्या स्नुषा आहेत. वर्ध्यातून माजी मंत्री दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र यादीत तडस यांचेच नाव कायम राहिले.

महाराष्ट्रातील उमेदवार
नंदूरबार – हीना गावित
धुळे – सुभाष भामरे
रावेर- रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
गडचिरोली-चिमुरी – अशोक नेते
चंद्रपूर- हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपिल पाटील
मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – डॉ. प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकरराव श्रृंगारे
सांगली – संजयकाका पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.