खामगाव प्रेस क्लबतर्फे उद्या पत्रकार बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पत्रकार दिनाचे औचित्य साधून खामगाव प्रेस क्लब खामगावच्या वतीने ५ जानेवारी रोजी पत्रकार बांधव व त्यांच्या परिवाराकरीता आरोग्य तपासणी शिबिर नांदुरा रोड वरील अग्रवाल हॉस्पिटल मध्ये सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये हाडांची तपासणी; मान, कंबर व गुड़घ्याची तपासणी;  तसेच कान व वाचादोष समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. शहरातील अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश जगदीश अग्रवाल व श्रवण व वाचा विशेषज्ञ डॉ. मंगेश धंदरे हे तपासणी करणार आहेत.

या शिबिरात सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगाव प्रेस क्लब खामगावचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, सचिव अनिल खोडके यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.