खान्देशातील 9 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

0

जळगाव :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर राज्यातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.छेरींग दोर्जे यांनी सोमवारी रात्री उशिरा काढले. नाशिक परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या खान्देशातील जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील 9 पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांचे नावे
धुळ्याचे दिवाणसिंग वसावे यांची नाशिक ग्रामीण तर भगवान मथुरे यांचीही नाशिक ग्रामीणला बदली झाली. जळगाव शहरचे एकनाथ पाडळे यांची नाशिक ग्रामीण, धरणगावचे चंद्रकांत सरोदे यांची नंदुरबार येथे तसेच जळगव जिल्हा पेठचे सुनील गायकवाड यांची नगरला तर चाळीसगावचे रामेश्वर गाडे यांची नाशिक ग्रामीण तसेच नंदुरबारचे गिरीश पाटील यांचीही नाशिक ग्रामीणला बदली झाली. नंदुरबारचे दीपक बुधवंत यांची जळगावला, नंदुरबारचे संजय महाजन यांची नाशिक ग्रामीणला बदली करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक ग्रामीण येथून खान्देशात आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.