हल्ल्याबाबतचे पुरावे भारताने आम्हाला द्यावे- इम्रान खान

0

इस्लामाबाद :- पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारताकडे कोणतेही पुरावे नसताना पाकिस्तानवर आरोप केले आहेत, अशा शब्दात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने या हल्ल्याप्रकरणातील भारताचे आरोप फेटाळून लावले आहेत. दहशतवादाच्या मुद्द्यावर आमची चर्चेची तयारी असून या हल्ल्याबाबतचे पुरावे भारताने आम्हाला द्यावे, असे आवाहन इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. जर भारत युध्दाच्या तयारीत असेल तर आम्हीही कोणत्याही गोष्टीत मागे नाही अशी धमकीही इम्रान खानने दिली आहे.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच इम्रान खान यांनी मी भारतीय सरकारसाठी उत्तर देत आहे असं सांगितले. कोणताही पुरावा नसताना पाकिस्तानवर आरोप करण्यात आले आहेत. या हल्ल्याचा पाकिस्तानला काय फायदा होणार आहे. पाकिस्तान स्थिरतेकडे जात असताना अशा गोष्टी पाकिस्तान करण्याचा विचार करणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानमधील कुणी जबाबदार आहे हे सिद्ध करणारे पुरावे भारताने दिल्यास पाकिस्तान सरकार त्या विरोधात कठोर कारवाई करेल, असेही खान म्हणाले. दहशतवादामुळे 70 हजार पाकिस्तानी मारले गेले आहेत. दहशतवाद मिटवावा अशी आमचीही इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.