खडसे शोकसभेतही आपलं टुणक वाजवतात- आ.पाटील

0
बोदवड, प्रतिनिधी – तालुक्यातील नाडगाव रेल्वे स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेत दि.१२ रोजी जिजाऊ जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या आयोजित शिबिराच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती म्हणून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आ.चंद्रकांत पाटील हे होते.
आ.पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आपल्या भाषणात त्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले.माजी आ.एकनाथराव खडसे आपल्यावरील झालेल्या पक्ष अन्यायाचे व आपल्या मुलीच्या पराभवाचं टुणक शोकसभेतही वाजवत असतात अशा शब्दांत त्यांनी खडसेंची खिल्ली उडविली.खडसे यांनी कायम आपल्या राजकारणात आपल्या कार्यकर्त्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता घराणेशाही चालवीत आपल्या नातेवाईकांनाचं मोठं केले.त्यामुळे ते एक नंबरचे अप्पलपोटे आहेत असा आरोप आ.पाटील यांनी यावेळी केला.जे पक्ष सोडण्याचा निर्णय घेवू शकतात व माझा काही भरवसा नाही असे स्पष्ट बोलू सांगतात अशा व्यक्तीला काय म्हणावं असं ते म्हणाले.सहकार समजायला दुसरा जन्म घ्यावा लागेल याला उत्तर देताना आ.पाटील म्हणाले की,माझ्या दुसऱ्या जन्माचं सोडून द्या मी या वर्षात तुमचं राजकारण संपविल्या शिवाय राहणार नाही अशी तंबीही त्यांनी यावेळी खडसेंना दिली.राजकारणात करोडो रुपयांची मालमत्ता जमविली कशी याचं उत्तर आधी माजी आ.खडसेंनी द्यावं,असा सवालही त्यांनी यावेळी बोलतांना विचारला.
मतदार संघातील प्रत्येक व्यक्ती हा आमदार असून या मतदारसंघातील मतदारराजाने या मतदारसंघातील घराणेशाही संपवून टाकली असून महाविकास आघाडीची सुरूवात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून झाली असेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असून येत्या सहा महिन्यांत पाण्याचा,विद्यार्थाचा,शेतकऱ्यांचे प्रश्न,व प्रलंबित विकास कामे मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
व्यासपीठावर विरेंद्रसिंग पाटील, मेहबूब शेख,डॉ.उध्दव पाटील, विनोद मायकर,भारत पाटील,सागर पाटील,डॉ.सुधीर पाटील,ईश्वर जंगले,अजय गवळी,आधारसिंग पाटील,दिलीप पाटील,धनराज जैस्वाल उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.