खडसे शिवसेनेत प्रवेश करणार? चंद्रकांत पाटील म्हणाले…

0

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काही काळापासून पक्षावर नाराज असून ही नाराजी त्यांनी अनेकवेळा उघडपणे बोलूनही दाखविली आहे. खडसे शिवसेनेत जाणार असल्याचेही वृत्त पसरले होते. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, खडसेंची केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि माझ्याशी भेट झाली. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याच्या वृत्ताला काही अर्थ नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच शिवसेनेकडे खडसेंना देण्यासाठी आहे तरी काय, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला

कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळली त्यामुळे भाजपाला अपयश आले. आम्हाला हरवण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागले, सोलापूर, सांगलीत आम्ही आलो हे लक्षात असू द्यावे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सत्तेसाठी सरकारने नीतीमुल्ये सोडली आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा कॅबिनेट मंत्री झाले. इतरांचे त्यांना काही पडलेले नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. तर विधानसभा अध्यक्षाची निवडणूक आजही गुप्त मतदानाद्वारे घेऊन दाखवावी, असे खुले आव्हान पाटील यांनी महाविकास आघाडीला दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.