महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावर असणारा अभियंत्याला उडविले

0

जळगाव । राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असून महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीच्या तरुण अभियंत्याचा चारचाकी वाहनाने धडकेत मृत्यू झाला आहे. सागर प्रकाश बऱ्हाटे (वय २२, रा.हनुमान नगर भुसावळ) असे या अभियंताचे नाव आहे. ही घटना आज दुपारी  महामार्गावरील मकरा फटाके एजन्सीजवळ घडली.  दरम्यान,धडक दिल्यानंतर महिंद्रा कंपनीची बोलरो गाडी घटनास्थळावरून पसार झाली.

भुसावळ-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आयुष प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला चौपदरी करण्याचा ठेका मिळालेला आहे. त्यानुसार दीड वर्षांपासून महामार्गाचे काम सुरू आहे. या कंपनीत इंजिनिअर म्हणून सागर बऱ्हाटे चार महिन्यांपूर्वी रुजू झाला आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास सागर कामावर आला महामार्गावरील मकरा एजन्सी जवळ आज काम सुरू होते या दरम्यान रस्ता पार करत असताना चुकीच्या बाजूने भुसावळ कडून जळगाव कडे येणाऱ्या विना नंबरच्या बोलोरोने धडक दिली. या धडकेत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, साईटवर काम करणाऱ्या सहकारी

दरम्यान या मार्गाने आतापर्यंत अनेक सामान्य नागरिकांचे बळी घेतले आहे. विशेष म्हणजे आजच्या अपघातात या महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या अभियांत्याचाच बळी गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.