खडसे – महाजन – चंद्रकांत पाटलात वार – पलटवार

0

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जळगाव जिल्ह्याची राजकीय समिकरणे बदलली आहेत. राज्यातील भाजपची सत्ता गेली. तशी जिल्ह्यातही भाजपला घरघर लागली. जिल्ह्यात एकूण 11 पैकी भाजप 7 वरून 4 आमदारच निवडून आले. रावेर, अमळनेर आणि मुक्ताईनगर या तिन्ही जागा पराभूत होण्यास भाजपचीच खेळी कारणीभूत ठरली. रावेरच्या हरिभाऊ जावळेंचा अपक्ष आमदाराला पाठीशी घातल्याने भाजप मुळेच पराभव झाला. अमळनेरच्या चौधरींचा भाजपने बळी घेतला. हे सर्व स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप कमकुवत करण्यास भाजपच जबाबदार आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मुक्ताईनगरमधून चाळीस वर्षे भाजपचे राजकारण करणारे एकनाथराव खडसे कन्येच्या पभरावानंतर आणि भाजपच्या राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीत गेले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुखांनी तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष उमेदवारी लढविली. त्यांना भाजपसह सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांचा निसटचा विजय झाला. चंद्रकांत पाटलांच्या विजयात जामनेरचे भाजपचे आमदार गिरीश महाजन यांचा हात असल्याचा आता नाथाभाऊंनी स्पष्ट आरोप केलाय. त्यामुळे नाथाभाऊ विरूध्द गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांनी संधी मिळेल तिथे वार करीत राहतात आणि नाथाभाऊ पलटवार करीत असतात. वार – पलटवाराचा हा खेळ चालू आहे.

एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील आरोप – प्रत्यारोप आणि नाथाभाऊ तसेच आ. चंद्रकांत पाटील यांच्यातील आरोप – प्रत्यारोप दोन्हीमध्ये अंतर आहे. तथापि गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांना नाथाभाऊंच्या राजकीय नेतृत्वाची भीती वाटते. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील निवडून आल्यानंतर आता मुक्ताईनगरची जागा टिकवून ठेवण्यासाठी गेल्या 40 वर्षात एकनाथराव खडसेंनी मुक्ताईनगर मतदारसंघात कसलीच विकास कामे केली नाहीत असा आरोप करताहेत. अवघ्या दोन वर्षात शेकडो कोटीची विकास कामे माझ्या कारकिर्दीत होताहेत असा दावा करून खडसेंच्या समर्थकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करताहेत. चंद्रकांत पाटलांचा वार नाथाभाऊंवर विकास कामांच्या संदर्भात असला तरी नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ यांच्यातील वाद मात्र एकमेकाच्या संपत्तीविषयीचा आहे. तसेच गिरीश महाजन हे नाथाभाऊंच्या नेतृत्वात राजकारणाचे धडे घेतले. परंतु नाथाभाऊंच्या कठीण समयी त्यांची साथ सोडली. नाथाभाऊचं राजकारण संपल्याशिवाय आपले जिल्ह्यातील स्थान अबाधित राहणार नाही. हे गिरीशभाऊंना माहिती असल्यामुळे खडसे विरोधातील भाजपच्या वहात्या गंगेत हात धुवून घेतले. राजकारण या गोष्टी चालतच असतात. त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या विजयाची जेवढी जखम नाथाभाऊंना झाली त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त खोल जखम आ.गिरीश महाजनांच्या भूमिकेमुळे झाल्या हे निसंशय खरे आहे. परंतु गिरीश महाजन म्हणतात पक्षाच्या भूमिकेचे मी प्रामाणिकपणे पालन केले. असे वक्तव्य करावेच लागते. त्यामुळे आता यापुढे जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच उलथा पालथ होणार आहे.

मुक्ताईनगर आणि बोदवड नगरपरिषदेतील भाजपचे नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देवून नाथाभाऊंना मोठा  धक्का दिला असे चंद्रकांत पाटील म्हणतात आणि मतदार संघात माझी बाजू भक्कम असल्याचा दावा करतात तथापि चंद्रकांत पाटलांची भक्कम बाजू आगामी विधानसभेत स्पष्ट होईल. दुसरीकडे गिरीश महाजन म्हणतात. जामनेर मतदार संघात निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी फिरकरलो नसतांनाही 40 हजारांच्या मताधिक्क्याने मी निवडून आलो. ज्यांनी 40 वर्षे राजकारणात असतांना आणि मतदार संघात मतदानापर्यंत प्रचार करूनसुध्दा पराभूत का का व्हावा? याचं आत्मपरिक्षण नाथाभाऊंनी करावे. या महाजनांच्या  आरोपानंतर नाथाभाऊंनी मास्तरांच्या मुलाचे 1200 कोटीची मालमत्ता आली कशी? एवढावर नाथाभाऊ थांबले नाही तर बीएचआर घोटाळ्यातून 10 कोटीची जमीन घेतल्याचे उतारे त्यांच्याकडे असल्याचा आरोप केला.

नाथाभाऊ इडीच्या चौकशी संदर्भात कोर्टात चार्जशीट दाखल झाले आहे. कोर्टावर विश्वास असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर गिरीश महाजन यांनी नाथाऊंचे मानसिक संतुलन बिघडल्याचा घणाघात केला. एकदंरित या तिघांमध्ये जे आरोप प्रत्यारोप होतोहेत त्यातून जिल्ह्यासाठी चांगलेच निष्पन्न होणार आहे. एकनाथराव खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात मतदार संघातील नेतृत्वासंदर्भात आहे. तो कायम राहील यात शंका नाही. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून येण्यासाठी आरोप प्रत्यारोप होतच राहणार दुसरे गिरीश महाजन व नाथाभाऊ यांचेतील वाद जोपर्यंत इडीचा निकाल लागत नाही. तोपर्यंत चालू राहील. इडीच्या निकाल खडसेंच्या बाजूने लागला तर दोघामधील पुढच्या राजकारणाची रणनिती वेगळी राहील. हे मात्र निश्चितच. परंतु नेत्यामधील आरोप प्रत्यारोपात जिल्ह्याचा विकास मात्र खुंटतो आहे. जिल्ह्याच्या विकासावर त्याचा परिणाम होतोय. तरीसुध्दा जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत सर्वपक्षीय पॅनेल बनविण्यासाठी हे नेते एकत्र येत आहेत ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचे म्हटले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.