खडकदेवळा येथील हिवरा मध्यम प्रकल्पाचा उजवा कालवा फोडला

0
पाचोरा ️ प्रतिनिधी
 तालुक्यातील खडकदेवळा येथील हिवरा मध्यम प्रकल्पाच्या डावा कालव्यातुन नुकतेच आवर्तन सोडले होते. हे आवर्तन शेवटच्या शेतकऱ्यां पर्यंत पोहचत नाही तोच कोणी तरी अज्ञाताने हा उजवा कालवा फोडला असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. शेतकरी वर्गाने मोठ्या आशेवर आपल्या पिकांचे नियोजन करून रब्बीची पेरणी केली आहे. त्यात आता ह्या  रब्बी पिकाला एक पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पाणी वेळेवर मिळाले तरच शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न येवु शकते अन्यथा शेतकऱ्यांचे पिक हे पाण्या अभावी वाया जाऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाली असतांना देखील दि. ८ रोजी या उजव्या कालव्यात आवर्तन सोडले होते. हे आवर्तन शेवटच्या शेतकऱ्यां पर्यंत पोहचत नाही तोच कोणी तरी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणीतरी अज्ञातांनी हा उजवा कालवा फोडला असल्याने सोडलेले पाणी वाया जाऊ लागल्याने ते वेळीच बंद करावे लागेल. यामुळे माञ शेतकऱ्यांच्या  तोंडी आलेला घास वाया जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी माञ संबंधीत हिवरा माध्यम प्रकल्पाच्या एकाही अधिकारी यांच्याकडून कारवाई होतांना दिसुन येत नाही. या हिवरा मध्यम प्रकल्पात अनेक वेळा कालवे फोडल्यानंतर देखील संबधित अधिकारी यांच्याकडून कुठलेही कारवाई न झाल्यानेच कालवे फोडल्याच्या घटना घडल्या असलेल्याचे शेतकरी वर्गाने सांगितले आहे. तरी संबंधीत व्यक्तीचा शोध घेवुन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
*हिवरा मध्यम प्रकल्प रामभरोसे*
खडकदेवळा येथील प्रसिध्द असलेल्या हिवरा मध्यम प्रकल्पाच्या कार्यालयात कुठलाही जबाबदार अधिकारी उपस्थित राहात नाहीत. त्यामुळे त्यामुळे हा हिवरा माध्यम प्रकल्पाच रामभरोसे झाला आहे. या प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन नसल्याने गोंधळ उडाला आहे. या प्रकल्पाच्या कार्यालय हे नेहमीच बंदच दिसते. याठिकाणी नियुक्त असलेले शाखा अधिकारी पी. एम. घुगे हे कोरोना लाॅक डाऊन मुळे नाशिक येथे राहते घरीच थांबून कामकाज पाहत असल्याचे उघडकीस आले आहे. संबधित शाखाअधिकारी यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळतच नाहीत. ते कोरोना संसर्गजन्य रोगाचे कारण सांगुन दांडी याञेवर गेलेलं आहे. नाशिक येथुन नौकरी च्या ठिकाणी येण्यासाठी गाड्याच नसल्याचे कारण सागुंन ते येत नाही असे शेतकरी वर्गाने चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.