क्वारंटाईन आणि कोविड पेशंटला रेडक्रॉसतर्फे रोज फळे वाटप

0

जळगाव- शहरात उपचार घेत असलेले कोविड रुग्ण आणि क्वारंटाईन व्यक्तींना रोज रेडक्रॉस तर्फे फळे देण्यात येत आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जळगाव शाखेच्यावतीने 21 मे पासून अभियांत्रिकी मुलींचे वसतिगृह येथे असलेल्या क्वारंटाईन व्यक्ती आणि कोविड19 कोरोना रुग्णालयात असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना रोज फळे देण्यात येत आहे.

रोज नियमित 600 ते 700 फळांची पॅकेट देण्यात येत आहे. रेडक्रॉस ची सुरू असलेले सर्व सेवाभावी उपक्रम आणि त्याची सुयोग्य अंमलबजावणी पाहून प्रशासनाने आता फळ देण्याची देखील जबाबदारी रेडक्रॉस वर सोपवली. जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांच्या निर्देशानुसार उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख सुभाष साखला यांचे सह सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली फळे देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ओसवाल मंगल कार्यालयात रेडक्रॉस पीआरओ उज्वला वर्मा, शितल शिंपी, प्रशांत पाटील, लाला शर्मा, अनिल पाटील, जमील शेख फ्रुट पॅकेट करण्यासाठी मेहनत घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.