शेंदुर्णीत सोशल डिस्टंशिनचे उल्लंघन करणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई

0

शेंदुर्णी (प्रतिनिधी) : करोनाच्या पार्श्वभुमीवर आज शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत रस्त्यावर उतरले .सोशल डिस्टंशिन न पाळणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्या शेंदुर्णीतील विविध अस्थापणांवर धडक मोहीम उघडत दंडात्मक कारवाई केली यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असुन या मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

करोनावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध पद्धतीने ,प्रशासनाच्या माध्यमातुन कडक अंमलबजावणी होत आहे.शेंदुर्णीत मात्र याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र काही दिवसात दिसायला लागले होते.

आज सकाळी मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या सह नगरपंचायतीचे कर्मचारी कलिम शेख,विलास जोहरे,मधुकर बारी,राजकुमार बारी,दिनेश कुमावत,सुनील निकम,सुनील मोची यांनी शेंदुर्णीतील विविध दुकाने, हातगाडी, ज्वेलर्स, कपड्यांची दुकाने आदींवर धडक कारवाई केली.

शहरातील सुप्रसिद्ध रेडिमेड कपड्यांच्या दुकानात सोशल डिस्टंशिन चा पुर्णपणे फज्जा उडालेला होता व मास्कचा वापरही करण्यात आलेला नव्हता तेव्हा या दुकानदारांना समज देवुन ३१००/रुपयांचा दंड तर काही कपड्यांची दुकाने, ज्वेलर्स  यांच्या येथे मास्कचा वापर केला नाही म्हणुन प्रत्येकी ५००/रुपयांचा दंड तर वडापाव विकणाऱ्यांवरही कारवाई झाली. पार्सल देण्याची मुभा असतांनाही ग्राहक तेथेच गर्दी करुन खात असतांना आढळले म्हणुन दोन वडापाव चालविणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकी ५००/रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

नगरपंचायतीच्या हद्दीतील सर्व सलुनची दुकाने बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी, व्यापारी यांनी सोशल डिस्टंशिन पाळावे,मास्कचा वापर करावा,सँनिटायझर चा वेळोवेळी उपयोग करावा असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले असुन अशीच धडक मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.