कोविड साथरोगावरील आवश्यक उपाय योजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

0

बुलडाणा प्रतिनिधी : कोविड 19 या साथरोगावरील विविध आवश्यक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर संबंधित कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  त्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा संबंधित कामे, ऑक्सिजन बेड, आयसीयु बेड संबंधित सर्व कामांची माहिती ठेवणे, खाजगी व शासकीय डेडीकेटेड कोविड हेल्थ हॉस्पीटल मधील मनुष्यबळ व्यवस्थापन करणे आदी कामांसाठी उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे व सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश घोलप यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच लसीकरणासाठी जिल्ह्यात होणारा लसींचा साठा व वितरण, लसीकरणाबाबत तक्रारी व त्यांचा निपटारा करणे आदी कामांची जबाबदारी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.  जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरवर भोजन, पाणी व स्वच्छतेबाबत नियोजन करणे, जिल्ह्यातील व इतर राज्यातील कामगार अथवा मजूर यांच्यासंदर्भातील सोपविलेली कामे यासाठी उपजिल्हाधिकारी अभिजीत नाईक यांना नोडल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आरटीपीसीआर, रॅपिड चाचणी संबंधित कामे व याबाबत असलेल्या तक्रारींचा निपटारा करणे, प्रतिबंधीत क्षेत्र व काँन्टॅक्ट ट्रेसिंग बाबतचे सर्व काम, मेडीको ॲडमिनीस्टरीअल डेथ ऑडीट करणे यासाठी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे नोडल अधिकारी आहेत.

जिल्ह्यातील वार रूम, कोविड समर्पित रूग्णालये, कोविड समर्पित आरोग्य केंद्र व कोविड केअर सेंटर आदी संबंधित इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे आदेश निर्गमीत करणे, जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची कोविड तपासणी करणे याबाबतील कामे यासाठी नायब तहसीलदार विजय पाटील यांना नोडल करण्यात आले आहे.  औषध कंपनीकडून रेमडेसिवीरचा होणारा पुरवठा व वाटप यावर नियंत्रण ठेवणे, तसेच काळाबाजार थांबविण्यासाठी कार्यवाही करणे तसेच इतर उपाययोजना करणे या कामासाठी उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे व सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन अशोक बर्डे यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.